Formation & Objectives
发布时间:2026-09-16 | 浏览:1
सिडकोची स्थापना १७ मार्च १९७० रोजी सिडको अर्थात ‘शहर आणि औदद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित’ची (क्र. १४५७४, १९६९-७०) कंपनी कायदा १९५६ अन्वये स्थापना करण्यात आली. या मान्यतेची अधिसूचना राज्य सरकारचा ठराव (शा.नि.क्र. आयडीएल/५७७०/आयएनडी-१) अन्वये दुसऱ्याच दिवशी जारी करण्यात आली आणि सिडकोला नवीन नगर विकास प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला. ती उपकंपनी होती सिकॉम अर्थात महाराष्ट्र राज्य औदद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळची. सिकॉमकडून मिळालेल्या २७० लाख रुपयांच्या कर्जसहाय्यासह १९७० मध्ये सिडकोने १० लाख रुपयांच्या भरणा झालेल्या भांडवलावर कार्य सुरू केले. सिडकोने त्याच वर्षी सिकॉमकडून आणखी १६,६०,०६८.०५ रुपयांचे कर्ज घेतले.
२४ मार्च १९७० रोजी सिडकोचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. जे. बी. डिसूझा, वरिष्ठ भारतीय प्रशासकिय सेवा अधिकारी, यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. सिकॉमचे अध्यक्ष, तत्कालीन आयसीएस अधिकारी, श्री. एन. एम. वागळे यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. सिडकोचे पहिलेच व्यवस्थापकीय संचालक श्री. जे. बी. डिसुझा यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर विविध क्षेत्रातील ज्या तज्ज्ञ व्यक्तिंची सल्लागार म्हणून नेमणूक केली त्या चमूनेच सिडकोचे एक बहुआयामी संघटन असे स्वरूप निर्धारित केले, तेच पुढे कायम राहिले. श्री. शिरीष पटेल (नगर विकास तज्ज्ञ), डॉ. फिरोज मेधोरा (अर्थतज्ज्ञ), डॉ. माधवराव गोरे (समाज विज्ञान तज्ज्ञ), श्री. के. पी. बत्तीवाला (संरचना व व्यवस्थापन तज्ज्ञ), श्री. विजय तेंडूलकर (लेखक/विचारवंत), श्री. चार्ल्स कोरिया (वास्तूरचना तज्ज्ञ) आणि डॉ. किरीट पारीख (यंत्रणा संशोधन तज्ज्ञ) यांचा त्या आठ तज्ज्ञ सल्लागारांमध्ये समावेश होता. आपआपल्या विशिष्ट क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरीबद्दल यांना पुढील काळात राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यातील डॉ. गोरे (पद्म भूषण), डॉ. पारीख (पद्म भूषण) श्री. तेंडूलकर (पद्म भूषण) आणि श्री. कोरिया (पद्मश्री) सन्मान मिळाले.
उद्दिष्ट्ये महाराष्ट्र शासनाने सिडकोची 'विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नियुक्ती केली ती खालील उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येस नियंत्रित करण्यासाठी स्थलांतरित होणा-या नागरिकांसाठी पर्यायी शहराची निर्मिती करणे.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येस नियंत्रित करण्यासाठी स्थलांतरित होणा-या नागरिकांसाठी पर्यायी शहराची निर्मिती करणे.
मुंबईच्या रस्ते वाहतूक, रेल्वे यंत्रणा या भौतिक सुविधांवरला ताण कमी करून करण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभारणे
मुंबईच्या रस्ते वाहतूक, रेल्वे यंत्रणा या भौतिक सुविधांवरला ताण कमी करून करण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभारणे
विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील नागरिकांना सौख्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा आणि स्थैर्य देणाऱ्या बाबिंसोबतच उच्च जीवनमूल्यांनीयुक्त पायाभूत सोयी–सुविधा उपलब्ध करून देणे
विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील नागरिकांना सौख्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा आणि स्थैर्य देणाऱ्या बाबिंसोबतच उच्च जीवनमूल्यांनीयुक्त पायाभूत सोयी–सुविधा उपलब्ध करून देणे
राज्याच्या औदद्योगिक धोरणाला अनुसरून उदद्योगांचा समतोल विकास साधण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करून रोजगाराकरिता स्थलांतर करणा-या लोकांना व्यापार-उदिमासह रोजगार-स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे
राज्याच्या औदद्योगिक धोरणाला अनुसरून उदद्योगांचा समतोल विकास साधण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करून रोजगाराकरिता स्थलांतर करणा-या लोकांना व्यापार-उदिमासह रोजगार-स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे
सामाजिक एकात्मतेस पूरक व मनुष्यबळाच्या स्त्रोताला अधिक कार्यक्षमता देणारे चैतन्यदायी वातावरण उपलब्ध करणे
सामाजिक एकात्मतेस पूरक व मनुष्यबळाच्या स्त्रोताला अधिक कार्यक्षमता देणारे चैतन्यदायी वातावरण उपलब्ध करणे
उच्च जीवनमुल्यांनी युक्त राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी आणि नव्या शहराच्या विविध स्तरांमध्ये निर्माण होणारी संभाव्य सामाजिक व आर्थिक विषमता दूर करून नव्या नागर जीवनात सामावून घेण्यासाठी, सार्वजनिक जीवनात महत्वाचे योगदान देण्यास सक्षम करण्यसाठी नियोजित प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना प्रशिक्षित करणे